
Monday, November 15, 2010
The Hrishikeshness

जपत किनारा शीड सोडणे नामंजूर,
अन् वार्याची वाट पाहणे नामंजूर.
मी ठरवावी दिशा वाहत्या पाण्याची,
येईल त्या लाटेवर डूलणे नामंजूर.
नामंजूर नामंजूर नामंजूर.
जपत किनारा शीड सोडणे नामंजूर,
अन् वार्याची वाट पाहणे नामंजूर.
मला ऋतूंची साथ नको अन् कौल नको,
मला कोठल्या शुभ शकुनांची झूल नको.
मुहूर्त माझा तोच ज्या क्षणी हो इच्छा,
वेळ पहुनि खेळ मांडणे नामंजूर.
जपत किनारा शीड सोडणे नामंजूर,
अन् वार्याची वाट पाहणे नामंजूर.
माझ्या हाती विनाश माझा कारण मी.
मोहासाठी देह ठेवतो तारण मी.
सुंदरतेवर होवो जगणे चक्काचूर,
मज अब्रूचे थीटे बहाणे नामंजूर.
जपत किनारा शीड सोडणे नामंजूर,
अन् वार्याची वाट पाहणे नामंजूर.
रुस्वे फुगवे भांडणटण्ते लाख कला,
आपला तुपला हिशोभ आहे हा सगळा.
रोख पावती इथेच द्यावी अन् घ्यावी,
गगनाशी नेणे गरहाणे नामंजूर.
जपत किनारा शीड सोडणे नामंजूर,
अन् वार्याची वाट पाहणे नामंजूर.
मी मनसवीतेला शाप मानले नाही,
अन् उपभोगला पाप मानले नाही.
ढग काळा ज्यातुन एक ही फिरला नाही,
नभ असले मी अध्यप पहिले नाही.
नीती तत्वे फस्वी गणिते दूर बरी,
रक्तातील आदिम जिण्याची ओढ़ खरी.
जगणया साठी रक्त वाहणे मज समजे,
पण रक्ताचा गर्व वाहणे नामंजूर.
जपत किनारा शीड सोडणे नामंजूर,
अन् वार्याची वाट पाहणे नामंजूर.
मी ठरवावी दिशा वाहत्या पाण्याची,
येईल त्या लाटेवर डूलणे नामंजूर.
नामंजूर नामंजूर नामंजूर.
Poet: संदीप खरे.
Album: नामंजूर
Hrishikesh Alshi
-Nagpur/Bangalore
Monday, August 2, 2010
माझ्या मना बन दगड!

हा रस्ता अटळ आहे !
अन्नाशिवाय, कपड्याशिवाय
ज्ञानाशिवाय, मानाशिवाय
कुडकुडणारे हे जीव
पाहू नको, डोळे शिव!
नको पाहू जिणे भकास,
ऐन रात्री होतील भास
छातीमधे अडेल श्वास,
विसर यांना दाब कढ
माझ्या मना बन दगड!
हा रस्ता अटळ आहे !
ऐकू नको हा आक्रोश
तुझ्या गळ्याला पडेल शोष
कानांवरती हात धर
त्यांतूनही येतील स्वर
म्हणून म्हणतो ओत शिसे
संभाळ, संभाळ, लागेल पिसे!
रडणाऱ्या रडशील किती?
झुरणाऱ्या झुरशील किती?
पिचणाऱ्या पिचशील किती?
ऐकू नको असला टाहो
माझ्या मना दगड हो!
हा रस्ता अटळ आहे !
येथेच असतात निशाचर
जागोजाग रस्त्यावर
असतात नाचत काळोखात;
हसतात विचकून काळे दात
आणि म्हणतात, कर हिंमत
आत्मा विक उचल किंमत!
माणूस मिथ्या, सोने सत्य
स्मरा त्याला स्मरा नित्य!
भिशील ऐकून असले वेद
बन दगड नको खेद!
बन दगड आजपासून
काय अडेल तुझ्यावाचून?
गालावरचे खारे पाणी
पिऊन काय जगेल कोणी?
काय तुझे हे निःश्वास
मरणाऱ्याला देतील श्वास?
आणिक दुःख छातीफोडे
देईल त्यांना सुख थोडे?
आहे तेवढे दुःखच फार
माझ्या मना कर विचार
कर विचार हास रगड
माझ्या मना बन दगड
हा रस्ता अटळ आहे !
अटळ आहे घाण सारी
अटळ आहे ही शिसारी
एक वेळ अशी येईल
घाणीचेच खत होईल
अन्यायाची सारी शिते
उठतील पुन्हा, होतील भुते
या सोन्याचे बनतील सूळ
सुळी जाईल सारे कूळ
ऐका टापा! ऐका आवाज!
लाल धूळ उडते आज
त्याच्यामागून येईल स्वार
या दगडावर लावील धार!
इतके यश तुला रगड
माझ्या मना बन दगड!
- Vinda Karandikar
Hrishikesh Alshi
Nagpur/Bangalore
Friday, May 28, 2010
जीवना तू तसा, मी असा !

सूर मागू तुला मी कासा ?
जीवना तू तसा, मी असा !
तू मला, मी तुला पाहिले
एकमेकांस न्याहाळिले
दुःख माझातुझा आरसा !
जीवना तू तसा, मी असा !
एकदाही मनासारखा
तू न झालास माझा सखा
खेळलो खेळ झाला जसा !
जीवना तू तसा, मी असा !
खूप झाले तुझे बोलणे
खूप झाले तुझे कोपणे
मी तरीही जसाच्या तसा !
जीवना तू तसा, मी असा !
रंग सारे तुझे झेलुनी
शाप सारे तुझे घेउनी
हिंडतो मीच वेडपिसा !
जीवना तू तसा, मी असा !
काय मागून काही मिळे ?
का तुला गीत माझे कळे ?
व्यर्थ हा अमृताचा वसा !
जीवना तू तसा, मी असा !
गीत – सुरेश भट
संगीत – पं. हृदयनाथ मंगेशकर
स्वर – अरुण दाते
Nagpur/Bangalore
Subscribe to:
Posts (Atom)